Thursday, 22 March 2012

"सागर आणि आकाश"

"सागर आणि आकाश"

तुझ हे असं झिमझिम धो धो बरसणं
अन त्याच ते धुक्यात लपेटून जाणं
तुझ सतत टिप गाळत रहाणं
तर त्याच बेफाम किनाऱ्याकडे धावणं
शेवटी तुम्हा दोघांच क्षितिजाकडे,
एका रेषेत एकमेकात सामावून जाणं
अन
असं झाल कि माझ उदास उदास होणं
मग जाणवणं कि तुम्ही तर दोघेही माझ्यातच आहात
त्या क्षणी सुरु होत माझ्या ...
डोळ्यात आकाश अन देहात सागर उतरणं
अश्रुंच झिमझिम धो धो बरसणं
अन भावनांच धुक्यात लपेटून बेफाम बेलगाम धावणं

No comments:

Post a Comment